डेबिट कार्ड बंद पडल्याचे सांगत दोन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 16:49 IST2018-09-19T16:48:14+5:302018-09-19T16:49:03+5:30
नाशिक : तुमचे डेबिट कार्ड बंद पडले आहे, ओटीपी द्या, त्वरित सुरू करून देतो, असा वारंवार फोन करून एका संशयिताने बँक खात्यातील दोन लाख आठ हजार ७४६ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडला आहे़

डेबिट कार्ड बंद पडल्याचे सांगत दोन लाखांची फसवणूक
नाशिक : तुमचे डेबिट कार्ड बंद पडले आहे, ओटीपी द्या, त्वरित सुरू करून देतो, असा वारंवार फोन करून एका संशयिताने बँक खात्यातील दोन लाख आठ हजार ७४६ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडला आहे़
मुंबई-आग्रा महामार्गावरील विडी कामगारनगरमधील रहिवासी हनुमान विश्वकर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २१ जुलै २०१८ रोजी दुपारच्या सुमारास एका संशयिताने ९४४९९३६५४२ या मोबाइल क्रमांकावरून त्यांच्या ७०७६४१४०३५ यावर फोन केला़ संशयिताने बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे डेबिट कार्ड बंद झाले आहे़ मोबाइलवरील ओटीपी नंबर मला द्या मी पुन्हा सुरू करतो असे सांगितले़ त्यानुसार ओटीपी दिल्यानंतर बँक खात्यातून परस्पर परस्पर काढून घेतली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़