पेठ ग्रामीण रु ग्णालयाच्या गळतीवर तात्पुरती मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:16 IST2018-07-20T00:14:37+5:302018-07-20T00:16:31+5:30
पेठ : येथे सुरू असलेल्या पावसाने येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांना त्यातच उपचार घ्यावे लागत असल्याच्या लोकमत वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ताडपत्रीच्या साहाय्यने तात्पुरती मलमपट्टी केली.

पेठ ग्रामीण रु ग्णालयाच्या गळतीवर तात्पुरती मलमपट्टी
पेठ : येथे सुरू असलेल्या पावसाने येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांना त्यातच उपचार घ्यावे लागत असल्याच्या लोकमत वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ताडपत्रीच्या साहाय्यने तात्पुरती मलमपट्टी केली.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या वरच्या भागात छत नसल्याने पावसाचे पाणी थेट इमारतीच्या मध्यवर्ती भागात रुग्ण नोंदणी कक्षात येत असल्याने रुग्णालयातच तळे साचले. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या आजारी रु ग्णांना पावसाच्या पाण्यातच उभे राहण्याची वेळ आली होती. याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही तक्रार केली. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने संबंधित विभाग जागा झाला. इमारतीच्या गच्चीवर ताडपत्री टाकून तात्पुरता आडोसा केला असून, मलमपट्टी झाली असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे रुग्णांनी सांगितले. अन्यथा ताडपत्री फाटल्यास मागील पाढे पंचावन्न अशी म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.