शिक्षक संघटनेचे दुग्धाभिषेक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:10 IST2017-08-03T23:50:02+5:302017-08-04T00:10:01+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक सहकार संघटनेची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदलीच्या मागणीचा पहिला टप्पा पूर्ण केल्याबद्दल आणि दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या वतीने गांधीगिरी मार्गाने दुग्धाभिषेक आंदोलन करून शिक्षण सचिव असीम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.

शिक्षक संघटनेचे दुग्धाभिषेक आंदोलन
सायखेडा : महाराष्ट्र राज्य शिक्षक सहकार संघटनेची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आंतरजिल्हा बदलीच्या मागणीचा पहिला टप्पा पूर्ण केल्याबद्दल आणि दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी संघटनेच्या वतीने गांधीगिरी मार्गाने दुग्धाभिषेक आंदोलन करून शिक्षण सचिव असीम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने साडेपाच हजारपेक्षा जास्त आंतरजिल्हा बदल्या केल्यामुळे शासनाचे आभार मानण्यासाठी आझाद मैदान येथे दुग्धाभिषेक आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातून हजारो शिक्षक उपस्थित होते. यावेळी राज्य पदाधिकारी संतोष पिट्टलवाड, अमोल ढगे, हनुमंत खुणे, किशोर पवार, मारोती देशमुख, शिक्षक सहकार संघटनेचे राज्य संघटक गजानन देवकाते, नाशिक विभागप्रमुख मारुती देशमुख, उपविभागप्रमुख अविनाश जुमडे, नाशिक जिल्हाध्यक्ष शरद बरमे, उपाध्यक्ष अशोक रेड्डी, कोशाध्यक्ष सुनील कैरमकोंडा तसेच परचंडे, भागवत, तागड,
सुधीर पाटील, बिरादर, गड्डा आदी शिक्षक उपस्थित होते.