सिन्नरला माजी विद्यार्थी एकीकरण सोहळा

By Admin | Updated: March 10, 2017 00:38 IST2017-03-10T00:38:26+5:302017-03-10T00:38:37+5:30

सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी सकाळी ९ वाजता माजी विद्यार्थी एकीकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे

Sinnar's alumni integration ceremony | सिन्नरला माजी विद्यार्थी एकीकरण सोहळा

सिन्नरला माजी विद्यार्थी एकीकरण सोहळा

सिन्नर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (दि. ११) रोजी सकाळी ९ वाजता माजी विद्यार्थी एकीकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून मविप्र संस्थेची धुरा सांभाळणाऱ्या सरचिटणीस नीलिमा पवार या सोहळ्यास उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. सिन्नर तालुक्याच्या गेल्या पाच दशकातील वाटचालीचे साक्षीदार आणि मविप्रचे ज्येष्ठ संचालक कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी शक्य झाल्यास ५२८२.ूङ्म.्रल्ल/ं’४ेल्ल्र या संकेत स्थळावर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Sinnar's alumni integration ceremony