तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’चा सिनेस्टाइल पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:45 IST2017-10-25T00:45:05+5:302017-10-25T00:45:10+5:30
चित्रपट महामंडळाचा सदस्य असल्याचे बतावणी करत जाहिराती व चित्रपटात ‘रोल’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महागड्या हॉटेलमध्ये तरुण-तरुणींना फोटोसेशन करणाºया तोतया निर्माता-दिग्दर्शकाचा बुरखा अखेर नाशिकच्या अस्सल कलावंतांनी फाडला. पांडवलेणी-घोटी असा सिनेस्टाइल पाठलाग करत पकडून पोलिसांच्या हवाली केले. पुणे पोलिसांचे गुन्हे शोध पथक तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’च्या मागावर होते; मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.

तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’चा सिनेस्टाइल पाठलाग
नाशिक : चित्रपट महामंडळाचा सदस्य असल्याचे बतावणी करत जाहिराती व चित्रपटात ‘रोल’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून महागड्या हॉटेलमध्ये तरुण-तरुणींना फोटोसेशन करणाºया तोतया निर्माता-दिग्दर्शकाचा बुरखा अखेर नाशिकच्या अस्सल कलावंतांनी फाडला. पांडवलेणी-घोटी असा सिनेस्टाइल पाठलाग करत पकडून पोलिसांच्या हवाली केले. पुणे पोलिसांचे गुन्हे शोध पथक तोतया दिग्दर्शक ‘सॅन्डी’च्या मागावर होते; मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील रहिवासी असलेला संदीप व्हरांबळे ऊर्फ सॅन्डी पाटील(३२) मागील काही वर्षांपासून ‘पोर्टफोलिओ’ तयार करून देण्याच्या नावाखाली चंदेरी दुनियेची भुरळ असलेल्या तरुण-तरुणींना गंडा घालण्याचा ‘उद्योग’ करत होता. मॉडेलिंगची आवड ठेवणाºया मुला-मुलींसह मॉडेलिंग फोटोग्राफी करणाºया छायाचित्रकारांचे संपर्क क्र मांक इंटरनेटच्या माध्यमातून मिळवून त्यांना आमिष दाखवत त्यांच्याकडून चित्रपट महामंडळाचे कार्ड देण्याच्या बहाण्याने शुल्काच्या नावाखाली रक्कम घेऊन पसार होत होता. शिर्डीच्या हॉटेलमध्ये आश्रय घेऊन त्याने मुंबईच्या दोन महिला कलावंतांना शिर्डीला शूटिंगसाठी बोलविले. मुंबईच्या मेकअप आर्टिस्ट व कोपरगावच्या एका प्रोफेशनल कॅमेरामनलाही त्याने गाठले. दोन दिवस शिर्डीच्या परिसरात शूटिंग केले यावेळी भाडोत्री इनोव्हा कारचा वापर केला; मध्यरात्री अचानकपणे त्याने शिर्डीमधील हॉटेल सोडले.
‘व्हॉट््स अॅप’वरून फिरली सूत्रे
सुयोगने सदर बाब शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. शिंदे यांनी त्या भामट्याचे छायाचित्र कलावंतांच्या व्हॉट््स अॅप ग्रुपमध्ये पोस्ट केले. त्यानंतर नाशिकचे श्याम लोंढे यांनी याबाबत सूत्रे हलविली. ज्या गाडीने सॅन्डीने पळ काढला ती गाडी ओळखीची असल्यामुळे गाडीमध्ये असलेल्या जीपीआरएसवरून गाडी मुंबईमध्ये नसून ती नाशिकच्या पांडवलेणीत असल्याचे समजले. त्यानंतर लोंढे, रफिक सय्यद, रवि जन्नावर, मयूर रोहम आदींनी पांडवलेणी गाठले. यावेळी सॅन्डीने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि तेथून पळ काढत महामार्गावरून काळी-पिवळी मारुतीने घोटी गाठले. घोटीमधील एका एटीएमच्या बाहेर त्यांना सॅन्डी मिळून आला.