सहा तोळ्यांचे दागिने परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:20 IST2017-11-15T00:17:47+5:302017-11-15T00:20:04+5:30

अंदरसूल : येथील कुसुमबाई दत्तात्रय घोडके यांना बाजारपेठेत सापडलेले सहा तोळे सोन्याचे दागिने त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Return the six bulls jewelry | सहा तोळ्यांचे दागिने परत

सहा तोळ्यांचे दागिने परत

ठळक मुद्देबाजारपेठेत सापडलेले सहा तोळे सोन्याचे दागिने त्यांनी प्रामाणिकपणे परतप्रामाणिकपणा बघून त्यांचेसर्वत्र कौतुक

अंदरसूल : येथील कुसुमबाई दत्तात्रय घोडके यांना बाजारपेठेत सापडलेले सहा तोळे सोन्याचे दागिने त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील व्यापारी किरण देविकसन सुराडे यांच्या सासूबाई श्रीमती इंदूबाई साखरे, रा.देऊळगाव राजा यांचे सोन्याचे दागिने कानातले, वेल, गंठण असे सहा तोळ्याचा ऐवज त्यांच्याकडून गहाळ झाला. त्यांचे घर अंदरसूलच्या मुख्य बाजारपेठेत असल्याने गावात खरेदीसाठी आलेल्या कोंडाजी रावजी घोडके यांच्या स्नुषा कुसुमबाई यांना ते सापडले. कुुसुमबाई यांनी आजूबाजूच्या नागरिकांकडे याबाबत चौकशी केली. दरम्यान घोडके यांना माहिती मिळताच त्यांनी सुराडे यांच्याकडे जाऊन ते सोनं सुराडे यांच्याकडे सुपुर्द केले. त्यांचा हा प्रामाणिकपणा बघून त्यांचेसर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या सोन्याचा आनंद व्यक्त करत किरण सुराडे यांनी घोडके दांपत्याचा शाल, साडी-चोळी भेट देऊन सत्कार केला.

Web Title: Return the six bulls jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.