समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:21 IST2018-03-02T00:21:31+5:302018-03-02T00:21:31+5:30

त्र्यंबकेश्वर/येवला : येवला शहरात होळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली.

Pray in the traditional way of celebrating Holi with enthusiasm in the society | समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

ठळक मुद्देहोळी पेटवून पुरणपोळीचा नैवेद्यटिमक्यांचा खणखणाटाचा निनाद

त्र्यंबकेश्वर/येवला : येवला शहरात होळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सायंकाळी घरासमोर व चौकाचौकात होळी पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्याचबरोबर समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करण्यात आली. येथील डी.जे. रोड भागात महत्त्वाची समजल्या जाणा-या होळी सौ. व अविनाश कुक्कर व मधली गल्ली परिसरात श्री. व सौ. मंगेश माळोकार, श्री.व सौ. जितेंद्र भागवत व श्री. व सौ.हर्शल बोरसे यांच्या हस्ते पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली.

होळी सणापासून विविध सणांना प्रारंभ होतो. होळीनंतर धुळवड, रंगपंचमी, गुढीपाडवा असे सण साजरे करण्यात येतात. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर तीन-चार दिवसांपासून नानाविध आकाराच्या टिमक्यांचा खणखणाटाचा निनाद घुमू लागला होता. रविवारी सायंकाळी महिला व युवतींनी होळी पेटविण्याच्या ठिकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. घरासमोर व चौकाचौकात रात्री उशिरापर्यंत होळ्या पेटविण्यात येत होत्या. महिला व युवतींनी होळीला नैवेद्य दाखवून पोळ्या होळीला अर्पण केल्या. मधली गल्ली परिसरातील सह्याद्री ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरात होळी पेटवली व परिसरातील केरकचरा एकत्र करून त्याची होळी केली. होळीच्या मध्यभागी
एरंडाच्या झाडाच्या फांद्या लावण्यात आल्या होत्या. फुगेसह सजावट करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर येथे पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला.

Web Title: Pray in the traditional way of celebrating Holi with enthusiasm in the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.