विमानतळ मार्गावर दिशादर्शक फलक लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:02 IST2018-08-29T01:01:00+5:302018-08-29T01:02:38+5:30

विमानतळाकडे जाणाऱ्या शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याबरोबरच विमानसेवेचे वेळापत्रक लावण्याची मागणी निमाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Place a guide board on the airport road | विमानतळ मार्गावर दिशादर्शक फलक लावावे

विमानतळ मार्गावर दिशादर्शक फलक लावावे

सातपूर : विमानतळाकडे जाणाऱ्या शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याबरोबरच विमानसेवेचे वेळापत्रक लावण्याची मागणी निमाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. नाशिक येथून सुरू झालेल्या विमानसेवेबाबत जनजागृती करण्याबरोबरच विमानतळाकडे जाणाºया मार्गांवर दिशादर्शक फलक लावणे, दिल्ली-मुंबईच्या धर्तीवर उड्डाणाचे वेळापत्रक लावणे, विमानतळाकडे जाणाºया रस्त्यांचे सौंदर्य वाढविणे, आग्रा रोड ते विमानतळ रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम लवकर व्हावे आणि विमानतळाशी निगडित पायाभूत सोयीसुविधा पुरविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सिद्धार्थ तांबे, अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांची भेट घेऊन निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, नितीन वागस्कर, पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष मनीष रावळ यांनी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले आहे.

Web Title: Place a guide board on the airport road