तडीपार गुन्हेगार नईम शेखला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 18:08 IST2018-05-22T18:07:48+5:302018-05-22T18:08:30+5:30
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई करण्यात येऊनही शहरात वावर असलेला सराईत गुन्हेगार नईम अब्बास शेख (३०,रा़ कथडा, मस्जिदजवळ, नाशिक) यास भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़२१) द्वारका परिसरातून अटक केली़

तडीपार गुन्हेगार नईम शेखला अटक
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई करण्यात येऊनही शहरात वावर असलेला सराईत गुन्हेगार नईम अब्बास शेख (३०,रा़ कथडा, मस्जिदजवळ, नाशिक) यास भद्रकाली पोलिसांनी सोमवारी (दि़२१) द्वारका परिसरातून अटक केली़
शहरातील पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार नईम शेख याच्यावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी १६ मार्च २०१८ रोजी हद्दपारीची कारवाई केली होती़ या कालावधीत विनापरवानगी शहरात प्रवेश गुन्हा असून, शेख याने कोणातीही पूर्वपरवानगी न घेता शहरात प्रवेश केला़ शेख शहरात आल्याचे भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. द्वारका परिसरातून त्यास अटक केली़
या प्रकरणी पोलीस नाईक पगारे यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात शेखविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़