एटीएम कार्डाची अदलाबदल करून सव्वाचार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 19:05 IST2018-01-09T19:02:30+5:302018-01-09T19:05:45+5:30
नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाकडील एटीएम कार्डाची भामट्याने बदली करून त्याद्वारे खात्यातील सव्वाचार लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़

एटीएम कार्डाची अदलाबदल करून सव्वाचार लाखांची फसवणूक
नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाकडील एटीएम कार्डाची भामट्याने बदली करून त्याद्वारे खात्यातील सव्वाचार लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़
श्रीराम भार्गवे (६५, रा़ड्रिम कॅसल सोसायटी, मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २० डिसेंबर २०१७ रोजी पेठ फाट्यावरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते़ त्यावेळी तेथे असलेल्या २५ वर्षीय संशयित तरुणाने भार्गवे यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्डाची अदला-बदली करून त्यांना शाहिस्ता पी. सय्यद नावाने एटीएम कार्ड दिले़
यानंतर २० डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत संशयिताने भार्गवे यांच्या बँक खात्यातून चार लाख २४ हजार रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भार्गवे यांच्या फिर्यादीनुसार संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़