नाशिकरोड, जेलरोडला पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:38 IST2017-09-02T00:38:05+5:302017-09-02T00:38:35+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचलन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, समाजकंटकांमध्ये जरब निर्माण व्हावी या उद्देशाने शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यावर वाहनांमधून व झोपडपट्टी, गावठाण आदि भागांतून पोलीस संचलन करण्यात आले.

नाशिकरोड, जेलरोडला पोलिसांचे संचलन
नाशिकरोड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचलन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, समाजकंटकांमध्ये जरब निर्माण व्हावी या उद्देशाने शहर पोलीस प्रशासनातर्फे नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यावर वाहनांमधून व झोपडपट्टी, गावठाण आदि भागांतून पोलीस संचलन करण्यात आले. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्तमोहन ठाकूर, अशोक नखाते, विजय देवरे, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे आदि पोलीस अधिकारी, राज्य राखीव दल तुकडी, शिघ्र कृती दल आदिंसह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. संचलनप्रसंगी पोलीस वाहने सायरन वाजवत जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये ‘काय झाले’ अशी भीती निर्माण झाली होती. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.