जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा बंद
By Admin | Updated: August 20, 2016 00:49 IST2016-08-20T00:47:49+5:302016-08-20T00:49:52+5:30
शेतकरी त्रस्त : सातपूर सोसायटीचे निवेदन

जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा बंद
सातपूर : जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा बंद केला असून, तो पूर्ववत सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी सातपूर विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो आणि सोसायट्यांना जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करण्यात येतो. जिल्हा बँकेने कर्जपुरवठा बंद केल्याने ऐन लागवडीच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. संस्थेकडे शेतकरी कर्जाची मागणी करीत आहेत, परंतु जिल्हा बँकेने कर्जपुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांना कर्ज देता येत नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा वेळेवर होत नाही. बँकेने कर्जपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सोसायटीचे अध्यक्ष विजय भंदुरे, शिवाजी मटाले, बाळासाहेब बंदावणे, मधुकर भंदुरे, मुरलीधर भंदुरे, दिलीप भंदुरे, दादा निगळ, दीपक मौले, किसन शेवकर, भिवानंद काळे आदि संचालकांनी केली आहे. (वार्ताहर)