हमालाच्या खुनाचे गूढ उकलले
By Admin | Updated: March 7, 2017 02:19 IST2017-03-07T02:19:32+5:302017-03-07T02:19:47+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या दीपक अहिरे या हमालाचा प्रेमप्रकरणातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे उघड झाले आहे.

हमालाच्या खुनाचे गूढ उकलले
पंचवटी : ओळखीच्या युवतीशी बोलतो तसेच दमदाटी, मारहाण व शिवीगाळ करतो, याचा राग मनात धरून चौघा संशयितांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या दीपक अहिरे या हमालाचा प्रेमप्रकरणातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे उघड झाले आहे. या खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोघा विधीसंघर्षित बालकांसह चौघांना ताब्यात घेतले आहे.