दोन घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:21 IST2017-09-18T00:21:01+5:302017-09-18T00:21:07+5:30
शहरात घरफोडीसत्र सुरूच असून, आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तसेच कडी-कोयंडा तोडून केलेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने तसेच लॅपटॉप असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला आहे़

दोन घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास
नाशिक : शहरात घरफोडीसत्र सुरूच असून, आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तसेच कडी-कोयंडा तोडून केलेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने तसेच लॅपटॉप असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला आहे़
घरफोडीची पहिली घटना धात्रक फाटा परिसरात गुरुवारी (दि़१२) दुपारच्या सुमारास घडली़ साकार पार्थ अपार्टमेंटमधील संदीप भामरे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी बारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅम कानातल्या रिंगा असा ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घटना महात्मानगरमधील पार्क अव्हेन्यू येथे घडली़ किशोर तुकाराम नंदेश्वर (२९, रा. महात्मानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत ते कामानिमित्त बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला ़तसेच घरातील दोन मोबाइल फोन, लॅपटॉप, आयपॅड असा २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़