किसान सभेचे ‘घेरा डालो-डेरा डालो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:24 IST2017-11-02T00:24:11+5:302017-11-02T00:24:25+5:30
अखिल भारतीय किसान सभेतर्फे दिल्लीतील संसद भवन परिसरात शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी ‘घेरा डालो- डेरा डालो’ आंदोलन सुरू असून, या आंदोलनात नाशिकहून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

किसान सभेचे ‘घेरा डालो-डेरा डालो’
नाशिक : अखिल भारतीय किसान सभेतर्फे दिल्लीतील संसद भवन परिसरात शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी ‘घेरा डालो- डेरा डालो’ आंदोलन सुरू असून, या आंदोलनात नाशिकहून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नवी दिल्लीत बुधवार (दि.१) पासून किसान सभेने शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनात ४ व ५ नोव्हेंबरला नाशिकसह महाराष्ट्र किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी भागांतून गुरुवारी (दि. २) हजारो कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून किसान सभेतर्फे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, २०१३ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी, शेतकरी-शेतमजूर यांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन मिळावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी, कृषिपंपांचे वीजबिल माफ करावे, शेतमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव देण्यात यावा तसेच समृद्धी महामार्ग रद्द करावा आदी मागण्या केंद्र सरकारसमोर मांडल्या जाणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे यांनी दिली आहे.