किरकोळ कारणावरून वडाळ्यात पिता-पुत्रास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 16:20 IST2018-08-08T16:19:45+5:302018-08-08T16:20:36+5:30

नाशिक : घरासमोर भंगार वस्तू टाकल्याची कुरापत काढून तिघांनी पिता-पुत्रास जबर मारहाण केल्याची घटना वडाळागावातील भारतनगरमध्ये घडली आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

 The father-son was beaten up for minor reasons | किरकोळ कारणावरून वडाळ्यात पिता-पुत्रास जबर मारहाण

किरकोळ कारणावरून वडाळ्यात पिता-पुत्रास जबर मारहाण

ठळक मुद्देकुरापत काढून मारहाण ; गुन्हा दाखल

नाशिक : घरासमोर भंगार वस्तू टाकल्याची कुरापत काढून तिघांनी पिता-पुत्रास जबर मारहाण केल्याची घटना वडाळागावातील भारतनगरमध्ये घडली आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतनगर येथील शिवाजीवाडीतील आसिफ शहा हा मंगळवारी (दि़७) सकाळी आठ वाजेच्या सुमारास भंगार वस्तूंची साफसफाई करीत होता़ यावेळी त्याच्या घराशेजारी राहणारे संशयित अकबर गुलाब शेख, शेख इम्तियाज अब्दुल कादिर व अमजद शेख अब्दुल कादिर यांनी भंगार वस्तू घरासमोर टाकू नको असे म्हणून कुरापत काढली.

यानंतर या संशयितानी हातातील लोखंडी टामीने आसिफ व त्याचे वडिलांच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले़ यानंतर संशयितांच्या नातेवाइकांनी या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत धमकी दिली़ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या या तिघांवरही गुन्हा दाखल करून सायंकाळी अटक केली़

Web Title:  The father-son was beaten up for minor reasons