शेतकरी भयग्रस्त, महावितरण सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:03 IST2017-11-09T23:36:14+5:302017-11-10T00:03:31+5:30
महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना ग्रामीण भागातील विजेचे जाळे तब्बल चार दशकांपूर्वी शेतातून ओढले असल्याने त्यांची क्षमता संपल्याने जीर्ण झालेल्या तारांमुळे गोदाकाठ भागात तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असले तरी तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

शेतकरी भयग्रस्त, महावितरण सुस्त
सायखेडा : महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना ग्रामीण भागातील विजेचे जाळे तब्बल चार दशकांपूर्वी शेतातून ओढले असल्याने त्यांची क्षमता संपल्याने जीर्ण झालेल्या तारांमुळे गोदाकाठ भागात तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असले तरी तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी कोणतेही पाऊल उचलत नसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
१९७० च्या कालखंडात ग्रामीण भागात शेतीसाठी वीज आली. त्या अगोदर बैलांच्या मदतीने चामड्याच्या मोटेद्वारे विहिरीतून पाणी बाहेर काढून शेतीला पाणीपुरवठा केला जात होता, त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आणि शेतकºयांच्या बांधावर शेतीसाठी वीज पोहोचली. विजेवर चालणारे पंप बाजारात उपलब्ध झाले, काम सोपे झाले, कमी वेळात जास्त पाणी शेतीला देता येऊ लागले. त्यावेळी शेतातून ठरावीक उंचीवरून तारा ओढल्या गेल्या. आज इतके दिवस झाले तरी अद्याप शासनाने तारा बदलल्या नाही, तारा त्याच असल्याने क्षमता कमी झाली आहे. पर्यायाने तारांना झोल पडला आहे, त्यामुळे तारा खाली आल्याने तारांचा स्पर्श एकमेकांना होतो, त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन विजेचे लोळ पडतात. अनेक ठिकाणी डीपीमध्ये फ्यूज आणि तारा नसल्याने तिथे शेतकरी स्वत:च्या हाताने तारांचे फ्यूज टाकत असल्याने स्पार्किंग होते. शेतात उसासारखे पीक असल्याने पाचट तत्काळ पेट घेते, त्यामुळे शेजारील पिके आगीत भस्मसात होत आहे.