कीटकनाशक तोंडावर उडाल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:52 IST2017-10-28T00:52:06+5:302017-10-28T00:52:06+5:30
तालुक्यातील मुसळगाव येथील महिलेच्या तोंडावर कीटकनाशक उडाल्याने उपचारा-दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

कीटकनाशक तोंडावर उडाल्याने महिलेचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव येथील महिलेच्या तोंडावर कीटकनाशक उडाल्याने उपचारा-दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. केशरबाई लक्ष्मण गायकवाड (५५) असे मृत महिलेचे नाव असून, रविवारी (दि. १५) अत्यवस्थ अवस्थेत सदर महिलेला आडगाव येथील पवार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी गायकवाड यांचा मृत्यू झाला. गायकवाड कुटुंबीयांनी झुरळे मारण्यासाठी कीटक-नाशकाचा वापर केल्यामुळे केशरबाई यांना त्रास झाल्याची चर्चा मुसळगाव येथे आहे़ याप्रकरणी आडगाव पोलिसांनी कीटकनाशकामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद केली आहे़