जिममध्ये व्यायामासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 17, 2017 00:54 IST2017-06-17T00:54:21+5:302017-06-17T00:54:37+5:30
सिडको : व्यायामासाठी जिममध्ये गेलेल्या युवकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सिडको परिसरात शुक्रवारी (दि़१६) सायंकाळच्या सुमारास घडली़

जिममध्ये व्यायामासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : व्यायामासाठी जिममध्ये गेलेल्या युवकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सिडको परिसरात शुक्रवारी (दि़१६) सायंकाळच्या सुमारास घडली़ अजिंक्य पांडूरंग लोळगे (१७ रा. एकताचौक, उत्तमनगर, सिडको) असे मयत युवकाचे नाव असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तमनगरच्या एकता चौकातील अजिंक्य लोळगे हा सायंकाळी व्यायामासाठी उपेंद्रनगर येथील अतुल डेअरीशेजारी असलेल्या जिममध्ये गेला होता़
व्यायामास सुरुवात करण्यापूर्वीच त्यास अचानक चक्कर आले व आपल्या मित्राच्या अंगावर कोसळला़ हा प्रकार
जिममधील ट्रेनर व व्यायामपटूंच्या लक्षात येताच त्यांनी त्यास
तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले़
मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले़