डिजिटल भारत घडविण्यासाठी योगदान द्या : सुभाष भामरे
By Admin | Updated: July 12, 2017 15:49 IST2017-07-12T15:49:42+5:302017-07-12T15:49:42+5:30
डिजिटल भारत घडविण्यासाठी सर्व देशप्रेमी व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे योगदान देऊन ‘जीएसटी’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील रहावे.

डिजिटल भारत घडविण्यासाठी योगदान द्या : सुभाष भामरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : डिजिटल भारत घडविण्यासाठी सर्व देशप्रेमी व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे योगदान देऊन ‘जीएसटी’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील रहावे. ग्राहकांनीदेखील ‘जीएसटी’ करप्रणाली व त्यामुळे होणारे राष्ट्र उभारणीचे कार्य लक्षात घेऊ मोलाची साथ द्यावी, असे आवाहन कें द्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
मंगळवारी डॉ. भामरे जिल्हा दौऱ्यावर आले होते. सकाळी सिडको येथील ‘जीएसटी’ कार्यालयात त्यांनी शहरातील औद्योगिक संघटनांसह विविध व्यावसायिक, ट्रेडर्स संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना डॉ. भामरे बोलत होते. व्यासपीठावर वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त आर. पी. शर्मा, अपिलीय आयुक्त मनोज शर्मा उपस्थित होते. डॉ. भामरे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून केंद्राचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालो आहे. जीएसटीबाबत जनजागृती तसेच प्रशासकीय अडचणींवर मात करून कार्यप्रणालीत सुलभता आणण्याची उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर सरकारने सोपविली आहे. करप्रणालीमध्ये पारदर्शकता, सुसूत्रता आणण्यासाठी व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जीएसटीची मोठी गरज होती. राष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर गतिमान करून डिजिटल भारताच्या निर्मितीकरिता जीएसटी करप्रणाली काळाची गरज होती ती मोदी सरकारने पूर्ण केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यावसायिक वर्गाने सकारात्मक दृष्टिकोनातून जीएसटीचा स्वीकार करावा, असे भामरे यावेळी म्हणाले.