ढोबळी मिरची लिलावाला प्रारंभ
By Admin | Updated: September 1, 2016 00:29 IST2016-08-31T23:52:40+5:302016-09-01T00:29:40+5:30
ढोबळी मिरची लिलावाला प्रारंभ

ढोबळी मिरची लिलावाला प्रारंभ
पिंपळगाव बसवंत : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ढोबळी मिरची लिलावाचा शुभारंभ करण्यात आला.
बाजार समितीच्या आवारात मागील वर्षापासून शेतकरीवर्गाच्या मागणीनुसार बाजार समितीने ढोबळी मिरचीचा लिलाव सुरू केला आहे. व्यापारी व अडते यांनी केलेल्या सहकार्यामुळे शेतकरी नाशिक, मुंबई आदि ठिकाणी ढोबळी मिरची विक्रीसाठी जात होते.
बाजार समितीने लिलाव सुरू केल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकरीवर्ग ढोबळी मिरची लागवडीकडे वळला गेला. या ठिकाणी चांदवड, सटाणा, देवळा, निफाड आदि भागातील शेतकरी ढोबळी मिरची याठिकाणी लिलावासाठी आणतात.
बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर, संचालक निवृत्ती धनवटे, शंकर ठक्कर, सचिव संजय पाटील आदिंच्या उपस्थितीत लिलावाला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशीच १२७० क्रेट बाजारात लिलावासाठी आले होते. बाजारभाव ५० पासून ४८५पर्यंत व्यापारीवर्गाने खरेदी केला. (वार्ताहर)