आम्मार मियाजी यांनी उलगडला आयर्न मॅन होण्याचा प्रवास
By Admin | Updated: April 13, 2017 19:13 IST2017-04-13T19:13:22+5:302017-04-13T19:13:22+5:30
आम्मार मियाजी यांनी उलगडला आयर्न मॅन होण्याचा प्रवास

आम्मार मियाजी यांनी उलगडला आयर्न मॅन होण्याचा प्रवास
नाशिक : ‘नाशिक रनर्स’च्या वतीने पहिला नाशिककर आयर्न मॅन असा बहुमान मिळवणाऱ्या आम्मार मियाजी यांचा सत्कार करण्यात आला. आयर्न मॅन होण्यासाठी घेतलेले प्रशिक्षण, कष्ट, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव या सर्व प्रवासावर यावेळी आम्मार मियाजी यांनी प्रकाश टाकला आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाकृष्णन्, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल व क्र ीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन आम्मार मियाजी यांचा सत्कार करण्यात आला.