रासबिहारी शाळेकडून केरळवासीयांसाठी २५ हजाराची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 16:52 IST2018-08-30T16:44:21+5:302018-08-30T16:52:56+5:30
सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला

रासबिहारी शाळेकडून केरळवासीयांसाठी २५ हजाराची मदत
नाशिक-‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे केवळ प्रतिज्ञेपुरतेच मर्यादित न ठेवता रासबिहारी शाळेने ते केरळ पुरग्रस्तांना मदत करून प्रत्यक्ष कृतीत आणले आहे. केरळमध्ये अतिवृष्टिमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने जे अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्यातुन सावरण्यासाठी सर्व भारतीयांचा सहभाग असणे आवश्यक आहे. याविषयीचे संस्कार आपल्या मुलांवर बालपणापासून असणे आवश्यक आहे हे लक्षात घेवून रासबिहारी शाळेने आपल्या प्रत्येक विद्यार्थी व कर्मचाऱ्याकडून किमान एक रु पया तरी देवून आपला सहभाग नोंदवावा या दृष्टीने आवाहन केले होते. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला. आतापर्यंत २५ हजार रु पये मदतनिधी म्हणून जमा झाला आहे. निधी जमा करण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. हा निधी लवकरच केरळवासियांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.