२० लाखांचे स्पिरीट जप्त
By Admin | Updated: May 20, 2017 00:46 IST2017-05-20T00:46:08+5:302017-05-20T00:46:20+5:30
सटाणा/ताहाराबाद : गुजरातहून नांदेडकडे जाणाऱ्या मालट्रक मधून सुमारे वीस लाख रूपये किमतीचा आठ हजार लिटर स्पिरीट साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

२० लाखांचे स्पिरीट जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा/ताहाराबाद : गुजरातहून नांदेडकडे जाणाऱ्या मालट्रक मधून सुमारे वीस लाख रूपये किमतीचा आठ हजार लिटर स्पिरीट साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने शुक्रवारी ताहाराबाद येथे ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
गुजरातकडून मोठ्याप्रमाणात अवैध स्पिरीटची (शुध्द मद्यार्क) वाहतूक केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बोगस विदेशी मद्य तयार करणारे रॅकेटचे गुजरातशी थेट कनेक्शन असून कसमादे पट्ट्यातही हे रॅकेट आता सक्रिय झाले आहे. बागलाण ,मालेगाव ,देवळा ,कळवण याभागात राजरोस हॉटेल व धाब्यांवर बनावट विदेशी मद्य विक्र ी केले जात आहे. या प्रकाराबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचे प्रमुख दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे , एन. आर. गुंजाळ यांना या अवैध स्पिरीट वाहतुकीची माहिती मिळाली होती. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या पथकाने ताहाराबाद येथील चौफुलीवर सापळा रचला होता.या सापळ्यात गुजरातहून येणारा मालट्रक क्र मांक (एमएच २६ एच ५९६८) पकडण्यात आला. या मालट्रक मध्ये निळ्या रंगाचे सुमारे बत्तीस बॅरेल आढळून आले. या बॅरेलमध्ये तब्बल आठ हजार लिटर स्पिरीट (शुध्द मध्यार्क ) आढळून आले. बाजार भावानुसार सुमारे वीस लाख रु पये किमतीचे हे स्पिरीट नांदेड येथे नेण्यात येत होते. ट्रक चालक संजय गलबाजी काळे (नांदेड ) याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. गेल्याच आठवड्यात मालेगाव येथील उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या पथकाने मंगळूरफाटा ,उमराणे येथे अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणारे कंटेनर जप्त केले होते. तसेच वऱ्हाने शिवारात अवैधरीत्या वाहतूक करणारे स्पिरीटचे तीस बॅरल पकडले होते. त्यांच्या या कारवाईने मद्य सम्राटांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.