बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणारा अभियंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:41 IST2018-01-18T23:40:15+5:302018-01-18T23:41:25+5:30
बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणाºया भुसावळ येथील एका अभियंत्याविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणारा अभियंता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस फेसबुक आयडी बनवून महिलांची बदनामी करणाऱ्या भुसावळ येथील एका अभियंत्याविरुद्ध इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निखिलेश मुद्दीराज (३०) असे आरोपीचे नाव आहे. निखिलेश अभियंता आहे. त्याने इमामवाडा येथील एका २३ वर्षीय युवती व तिच्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावाने बोगस फेसबुक आयडी तयार केला. युवती व कुटुंबातील महिला सदस्य व परिचितांबाबत आपत्तीजनक टिप्पणी केली. युवतीने यासंबंधात इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने निखिल नवनवीन फेसबुक आयडी तयार करीत होता. तेव्हा युवतीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.