महाराष्ट्र  व गोवा बार कौन्सिल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:25 IST2018-01-23T23:23:55+5:302018-01-23T23:25:05+5:30

बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maharashtra and Goa Bar Council announced the election programme | महाराष्ट्र  व गोवा बार कौन्सिल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र  व गोवा बार कौन्सिल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

ठळक मुद्दे२८ मार्चला मतदान : नागपुरातून अनेकांनी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कार्यक्रमानुसार, २५ जानेवारी रोजी निवडणुकीची नोटीस प्रकाशित केली जाणार आहे. १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी २२ फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. १ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार असून, २८ मार्च रोजी मतदान ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र व गोवा येथील नोंदणीकृत वकिलांना मतदान करता येणार आहे.
नागपुरातून अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. आसिफ कुरैशी, अ‍ॅड. संग्राम सिरपूरकर, अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. परिजात पांडे, अ‍ॅड. अनुपसिंह परिहार आदी निवडणूक लढविणार आहेत. कौन्सिलवर २५ सदस्य निवडून दिले जातात. गेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला आहे. परंतु, विविध कारणे व राजकीय डावपेचांमुळे ही निवडणूक लांबली. त्यामुळे वकिलांत असंतोष होता. निवडणूक जाहीर होताच वकिलांमध्ये उत्साह संचारला आहे.

Web Title: Maharashtra and Goa Bar Council announced the election programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.