गडावरून शिवज्योत आणताना दरीत कोसळून शिवभक्त ठार
By Admin | Updated: February 19, 2016 13:46 IST2016-02-19T13:24:53+5:302016-02-19T13:46:47+5:30
शंकर महादेव गायकवाड ( वय 26 ) हा तरुण काल रात्री 'शिवज्योत' घेऊन तोरणागड उतरत असताना कड्यावरुन खोल दरीत पडून दुर्दैवीरीत्या मृत्यू पावला

गडावरून शिवज्योत आणताना दरीत कोसळून शिवभक्त ठार
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 19 - शिवजयंती साजरी करण्यासाठी तोरणागडावर गेलेल्या शिवभक्ताचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाचे नाव शंकर महादेव गायकवाड ( वय 26 ) असून तो जावळी तालुक्यातील मोरघरचा राहणार आहे. काल रात्री तोरणागडारुन शिवज्योत घेऊन उतरत असताना कड्यावरुन खोल दरीत कोसळून या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शंकर गायकवाड हा शिरवळ येथील 'नीप्रो' कंपनीत कामाला होता. शिवजयंतीनिमित्त गावातील शिवप्रेमी मंडळाबरोबर तोरणागडावर 'शिवज्योत' आणण्यासाठी तो गेला होता.