युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:57 IST2018-02-16T00:56:52+5:302018-02-16T00:57:01+5:30
लघुशंकेसाठी घराबाहेर पडलेल्या युवतीवर अत्याचार केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील नवखा शेत शिवारात घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध १४ फेबु्रवारी रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवतीवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : लघुशंकेसाठी घराबाहेर पडलेल्या युवतीवर अत्याचार केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील नवखा शेत शिवारात घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध १४ फेबु्रवारी रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर युवती लघुशंकेसाठी १३ फेबु्रवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घराबाहेर आली होती. यावेळी आरोपी पप्पू भीमराव खुडे रा. कवडा ता. कळमनुरी याने युवतीचे तोंड दाबून अतिप्रसंग केला. याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून पप्पू खुडे याच्याविरूद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास सपोनि आडे करीत आहेत.