वर्गमित्रांच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: July 8, 2015 01:55 IST2015-07-08T01:55:27+5:302015-07-08T01:55:27+5:30
वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत तालुक्यातील राजापूर गावातील किरण सोनवणे (१३) या शाळकरी मुलाचा मंगळवारी मृत्यू झाला.

वर्गमित्रांच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू
संगमनेर (जि. अहमदनगर) : वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत तालुक्यातील राजापूर गावातील किरण सोनवणे (१३) या शाळकरी मुलाचा मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.
पाच दिवसांपूर्वी येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवीमधील किरणला मुलींकडे का पाहतो, असे म्हणत वर्गातीलच पाच मुलांनी बेदम मारहाण केली.