क्षुल्लक कारणावरून महिलेसह मुलाला मारहाण

By Admin | Updated: June 5, 2017 05:15 IST2017-06-05T05:15:15+5:302017-06-05T05:15:15+5:30

क्षुल्लक कारणावरून सुमन सावडे (४५) आणि त्यांचा मुलगा विशाल (२०) यांना मारहाण केल्याप्रकरणी राहुल यादव याच्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

Striking a child with a woman for a minor reason | क्षुल्लक कारणावरून महिलेसह मुलाला मारहाण

क्षुल्लक कारणावरून महिलेसह मुलाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : क्षुल्लक कारणावरून सुमन सावडे (४५) आणि त्यांचा मुलगा विशाल (२०) यांना मारहाण केल्याप्रकरणी राहुल यादव याच्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो या घटनेनंतर पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेट, फ्रोजन कंपनीसमोरील क्रांतिवीर लहूजी चाळीत राहणारा विशाल २ जून रोजी रात्री ८ वा.च्या सुमारास आई सुमन यांच्यासह साठेनगर येथून जात होता. त्याच वेळी विशालने त्याला आधीच्या भांडणाचा जाब विचारला. याचाच राग आल्याने राहुलने बांबूने त्याच्या डोक्यात आणि त्याच्या आईच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मारहाण केली. या झटापटीत त्याच्याही उजव्या हाताला मार लागला. या प्रकरणी ३ जून रोजी श्रीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक एस.जी. तुंगेनवार तपास करीत आहेत.

Web Title: Striking a child with a woman for a minor reason