सोलापूर- टेंभूर्णीजवळ अपघात, दोघेजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 18:37 IST2016-10-31T18:27:01+5:302016-10-31T18:37:11+5:30
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णीजवळ अपघात झाला असून या अपघातात करमाळा येथील दोघे जागीच ठार झाले

सोलापूर- टेंभूर्णीजवळ अपघात, दोघेजण जागीच ठार
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 31- सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभूर्णीजवळ अपघात झाला असून या अपघातात करमाळा येथील दोघे जागीच ठार झाले आहेत.हायवेवर दोन्ही मोटर सायकलची समोरासमोर धड़क झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर सोलापूर - पुणे महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती.
या अपघातात करमाळा तालुक्यातील सांगवी बाळू गजेद्र कामटे आणि दादा मच्छिंद्र कामटे हे जागीच ठार झाले तर मगन शामराव माने हा गंभीर जखमी झाला आहे.