महाबळेश्वरमध्ये हिमकणांची दुलई

By Admin | Updated: January 9, 2017 05:15 IST2017-01-09T04:27:06+5:302017-01-09T05:15:08+5:30

महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी हिमकणांची दुलई पसरली आहे. त्यामुळे येथे

Snowflakes dug in Mahabaleshwar | महाबळेश्वरमध्ये हिमकणांची दुलई

महाबळेश्वरमध्ये हिमकणांची दुलई

महाबळेश्वर (जि. सातारा) : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी हिमकणांची दुलई पसरली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांबरोबरच ग्रामस्थांचीही गर्दी होत आहे.
महाबळेश्वरमध्ये रविवारी सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा जोर वाढला आहे. येथील शनिवारी तापमान १२.६ अंश सेल्सिअस होते. रविवारी पहाटे त्यात दोन अंशांची घसरण होऊन १०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. वेण्णा तलावातील पाण्यामुळे या परिसरातील तापमान ४ ते ५ अंशांवर येते आणि दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते.
रविवारी सकाळी वेण्णा तलाव-लिंगमळा परिसरातील निसर्गाने ओढलेली हिमकणांची पांढरी शुभ्र दुलई पाहावयास मिळाली. निसर्गाच्या या चमत्काराची मौज मनमुरादपणे लुटण्यासाठी पर्यटक, निसर्गप्रेमी व स्थानिकांनी वेण्णा तलाव व लिंगमळा परिसर बहरला होता.
तलावातील जेटीवर मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठल्यामुळे हिमकण जमा झाले होते व संपूर्ण जेटी पांढरी शुभ्र झाल्याचे दिसत होते. वेण्णा तलावाचा पृष्ठभाग थंड वाफांमुळे व्यापून गेला होता. त्याचे मनोहारी दृश्य भुरळ घालत आहे. लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशी फळे, पालेभाज्यांच्या बागा हिमकणांनी अच्छादल्या होत्या. पाने, फुले, वेलींनी हिमकणांचा साज अंगावर परिधान केल्याचे विहंगम दृश्य मनाला मोहून टाकत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Snowflakes dug in Mahabaleshwar