पुण्यात २५० एनडीए कॅडेट्सना अन्नातून विषबाधा
By Admin | Updated: September 11, 2015 16:52 IST2015-09-11T16:16:13+5:302015-09-11T16:52:41+5:30
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये २५० कॅडेट्सना अन्नातून विषबाधा झाली होती.

पुण्यात २५० एनडीए कॅडेट्सना अन्नातून विषबाधा
ऑनलाइन लोकमत
पुणे , दि. ११ - खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये २५० कॅडेट्सना अन्नातून विषबाधा झाली. गुरूवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील २४७ विद्यार्थ्यांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात अाले असून तिघांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
एनडीएतील विद्यार्थ्यांना गुरूवारी दुपारच्या जेवणात अंड्यांची भाजी देण्यात आली होती. त्यानंतरच विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांना उपचारांसाठी तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ही भाजी खाल्ली नव्हती त्यांना कुठलाच त्रास न झाल्याने अंड्याची भाजीच विद्यार्थ्यांना बाधल्याचे बोलले जात आहे. काल रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांवर उपचार करून आज त्यांना सोडण्यात आल्याचे समजते.