भुसावळ यार्डात मालगाडीचे डबे घसरल्याने नागपूर-मुंबई वाहतूक ठप्प
By Admin | Updated: February 27, 2016 08:59 IST2016-02-27T08:50:44+5:302016-02-27T08:59:54+5:30
भुसावळजवळ मालगाडीचे चार डबे रुळांवरून घसरल्याने मुंबई व नागपूरदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली.

भुसावळ यार्डात मालगाडीचे डबे घसरल्याने नागपूर-मुंबई वाहतूक ठप्प
>ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. २७ - भुसावळजवळ मालगाडीचे चार डबे रुळांवरून घसरल्याने मुंबई व नागपूरदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या इतर गाड्यांवरही परिणाम झाला असून त्यांचे वेळापत्रक बिघडले आहे, त्या अनिश्चित काळासाठी विलंबाने धावत आहेत.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे डबे रुळांवरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी वाहतूक पूर्वपदावर आणखी ३ ते ४ तास लागतील. दुपारी १२ पर्यंत वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.