पुण्यात मांजर फेकल्याच्या वादातून महिलेचा खून

By Admin | Updated: July 3, 2017 11:40 IST2017-07-03T11:08:32+5:302017-07-03T11:40:13+5:30

घरात गेलेले शेजा-यांचे मांजर बाहेर फेकल्याच्या वादातून लाकडी दांडक्याने महिलेला मारहाण करण्यात आली त्यात तिचा मृत्यू झाला.

The murder of the cat in Pune, the murder of the woman | पुण्यात मांजर फेकल्याच्या वादातून महिलेचा खून

पुण्यात मांजर फेकल्याच्या वादातून महिलेचा खून

ऑनलाइन लोकमत 

वाकड, दि. 3 -  घरात गेलेले शेजा-यांचे मांजर  बाहेर फेकल्याच्या वादातून लाकडी दांडक्याने महिलेला मारहाण करण्यात आली त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना म्हाळुंगे (मुळशी) येथे रविवारी रात्री  घडली.पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
प्रभा मोहन रंगपिसे (वय ४०, रा. सुहास पाडाळे चाळ,म्हाळुंगे,पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
 
प्रभा यांचा मुलगा अजय मोहन रंगपिसे (वय २७) याने हिंजवडी ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अमोल संदिपान बालगुडे, गणेश उर्फ भैय्या श्रीमंत पाटील,आकाश राजेश मोंडे,राजू नंदकिशोर साळवे (रा.सर्व सुहास पाडाळे चाळ,म्हाळुंगे,पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
तर या मारहाणीत फिर्यादीसह त्यांचा भाऊ हृषिकेश रणपिसे  (वय १७),  मेहुने दादु भाऊसाहेब खलसे (वय ४६) हे जखमी झाले आहेत. याबाबत हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी अजय यांची बहीण सारिका खलसे यांचे मांजर शेजारीच राहणा-या राजू साळवे यांच्या घरात गेले असता त्यांनी ते रागाने बाहेर फेकले. 
 
याबाबत फिर्यादी यांचे मेहुणे दादु खलसे हे त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता झालेल्या बाचाबाचीतून राजू साळवे यांच्यासह वरील अन्य आरोपींनी फिर्यादीचा मेहुणा, भाऊ व आईला मारहाण केली. प्रभा यांच्या डोक्यात व पाठित लाकडी दांडके मारले. त्या आघाताने त्यांचा मृत्यु झाला. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Web Title: The murder of the cat in Pune, the murder of the woman