लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात होणार हेल्मेट सक्ती - दिवाकर रावते
By Admin | Updated: February 3, 2016 12:59 IST2016-02-03T12:55:56+5:302016-02-03T12:59:09+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात होणार हेल्मेट सक्ती - दिवाकर रावते
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ३ - संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.
औरंगाबादमध्ये सर्व दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले असून आता पुण्यातही या नियमाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. लवकरच पुण्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात येणार आहे, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली. तसेच यापुढे दुचाकी विकतानाच गाडीसोबत हेल्मेट देण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.