शेजारील देशासोबतचे संबंध सुधारायला हवेत - मेधा पाटकर
By Admin | Updated: October 18, 2016 18:04 IST2016-10-18T17:32:47+5:302016-10-18T18:04:13+5:30
पाक कलाकरांवरील बंदी अयोग्य आहे. शेजारील देशासोबतचे आपले संबध सुधारायला हवेत आणि त्यासाठी योजनाबद्ध राजकीय प्रक्रिया राबवायला हवी

शेजारील देशासोबतचे संबंध सुधारायला हवेत - मेधा पाटकर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - पाक कलाकरांवरील बंदी अयोग्य आहे. शेजारील देशासोबतचे आपले संबंध सुधारायला हवेत आणि त्यासाठी योजनाबद्ध राजकिय प्रक्रिया राबवायला हवी असे मत ज्येष्ठ समाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं आहे. त्या मुंबईमध्ये प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं.
त्या म्हणाल्या केवळ आर्थिक व्यवहारांवर संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. सरकारने राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांकडे पाठ फिरवली आहे.
२१ आणि २२ ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रीय समाजवादी एकता संमेलन होणार आहे. त्यासाठी २२ राज्यातील समाजवादी विचारसरणीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहीती मेधा पाटकर यांनी यावेळी दिली.