तारकर्ली समुद्र्रात दोघे बुडाले
By Admin | Updated: September 13, 2015 02:40 IST2015-09-13T02:40:48+5:302015-09-13T02:40:48+5:30
तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले तीन मित्र बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यातील एक सुदैवाने बचावला असून दोघे युवक बेपत्ता आहेत.

तारकर्ली समुद्र्रात दोघे बुडाले
मालवण (सिंधुदुर्ग) : तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले तीन मित्र बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. यातील एक सुदैवाने बचावला असून दोघे युवक बेपत्ता आहेत. अकोट-अकोला येथील प्रवीण भास्कर अरबट (२४, सध्या रा. एरोली-नवी मुंबई) व अमरावती येथील वैभव बबनराव गावंडे (२३, घणसोली-ठाणे) हे दोघे बेपत्ता असून, त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. तर अचलपूर अमरावती येथील राधेश्याम बाबूराव डिके (२३, रा. घणसोली) हा बचावला आहे.
तारकर्ली येथे शनिवारी आशिष विलासराव धाकडे (२४, कणकवली), सचिन नामदेव लोहारे (२३, नागपूर), राधेश्याम बाबूराव डिके, प्रवीण भास्कर अरबट, वैभव भगवान गावंडे आणि महेश लक्ष्मण भांगरे (कोथरूड) हे पर्यटनासाठी आले होते.(प्रतिनिधी)