बिग बींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

By Admin | Updated: February 16, 2017 02:24 IST2017-02-16T02:24:07+5:302017-02-16T02:24:07+5:30

लेखिका डॉ. स्वाती लोढा यांच्या ‘डोण्ट रेज युअर चिल्ड्रन, रेज युअरसेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन

Book release at the hands of Big B | बिग बींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

बिग बींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

मुंबई : लेखिका डॉ. स्वाती लोढा यांच्या ‘डोण्ट रेज युअर चिल्ड्रन, रेज युअरसेल्फ’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात पालकांना २१ व्या शतकातील पालन-पोषणाच्या तत्त्वांविषयीची माहिती देण्यात आल्याचे लोढा यांनी सांगितले. लोढा म्हणाल्या की, बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारखा एक आदर्श मुलगा, प्रेमळ बाप आणि मार्गदर्शन करणारे आजोबा अशा तिहेरी भूमिका यथायोग्य वठवणारी दुसरी व्यक्ती मिळणे कठीणच आहे. त्यामुळेच त्यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले. बच्चन यांनी आयुष्यभर घेतलेले कष्ट, त्यांची शिस्त आणि धैर्य यांमुळेच त्यांचे कुटुंब सर्वोच्च पातळीवर पोहचलेले आहे. याचेच अनुकरण इतर पालकांनी करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, ‘मलाही माझी पातळी वाढवण्याची गरज आहे’, असे मत लोढा यांचे पती व अभिनेते-कवी शैलेश लोढा यांनी व्यक्त केले. लोढा यांची आतापर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यातील ‘कम आॅन! गेट सेट अ‍ॅण्ड गो’ आणि ‘वाय वुमन आर व्हॉट देय आर’ ही पुस्तके विविध भाषांमध्येही प्रकाशित झाली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Book release at the hands of Big B