BMC ELECTION RESULT : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी
By Admin | Updated: February 23, 2017 18:25 IST2017-02-23T16:17:18+5:302017-02-23T18:25:59+5:30
शिवसेनेच्या विजयाचा दावा करतानाच ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्य आहे कारण ते एकत्र येणार नाहीत, असे मनोहर जोशी म्हणालेत.

BMC ELECTION RESULT : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महानगर पालिका निवडणुकांमधील शिवसेनेच्या विजयाबाबत सकारात्मक भावना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या विजयाचा दावा करतानाच ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्य आहे कारण ते एकत्र येणार नाहीत, असे मनोहर जोशी यावेळी म्हणाले.
शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर मुंबई मनपा निवडणुकांमध्ये शिवसेना मनसेला सोबत घेईल, असे वाटत होते. पण, मनसेच्या पुढाकाराला शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. शिवसेनेनं 'एकला चलो रे'चा नारा दिला.
मुंबईत भाजपाला रोखण्यासाठी आणि मराठी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त करण्यात येत होती. यासाठी मनसेचे बाळा नांदगावकर यांनी प्रयत्नही केला होता.
नांदगावकर यांच्यापूर्वी मनोहर जोशी यांनीही राज-उद्धव यांनी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आले नाही.
आता त्यांनी स्वतःच 'राज आणि उद्धव एकत्र येणे अशक्य आहे', असे सांगत त्यांच्या मनोमिलनाला पूर्णविराम दिला आहे.
Positive about our winning; Both brothers (Raj & Uddhav Thackeray) can't come together: Manohar Joshi, Senior Shiv Sena leader #BMCPolls2017pic.twitter.com/QPT5OLfk67
— ANI (@ANI_news) February 23, 2017