पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना घेतला चावा, परिसरात दहशतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:01 IST2017-08-23T22:57:30+5:302017-08-23T23:01:28+5:30
कुसुंबारोड येथे आज रात्री नऊ वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेतला. या घटनेमुळे सलीम नगर, निहाल नगर परिसरात दहशतीचे वातावरण

पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना घेतला चावा, परिसरात दहशतीचे वातावरण
मालेगाव (नाशिक), दि. 23 - शहरातील कुसुंबारोड येथे आज रात्री नऊ वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांना चावा घेतला. या घटनेमुळे सलीम नगर, निहाल नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुसुंबारोड येथे शेख समीर शेख सलीम (11) हा मुलगा हॉटेलमधून चहा घेऊन घरी येत असताना सर्वप्रथम कुत्र्याने चावा घेतला. यानंतर शेख अकिल (35),सैफुर रहेमान (23) शेख आमीर बशीर (35) आरमान शाह (32)मोहंमद आसिर (23)इमरान खान आरीफ खान (22)फिरोज खान करीम (32) यांना चावा घेतला. हे सर्व कुसुंबारोड मालेगाव येथील रहिवासी आहेत. या सर्व जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना घरी सोडण्यात आले आहे.