मधमाश्यांचा हल्ल्यात ३२ भाविक जखमी
By Admin | Updated: April 16, 2017 21:34 IST2017-04-16T21:34:11+5:302017-04-16T21:34:11+5:30
शिलोबा डोंगरावर असलेल्या शिलनाथ देवाच्या यात्रेस निघालेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला चढविला.

मधमाश्यांचा हल्ल्यात ३२ भाविक जखमी
आॅनलाइन लोकमत
सातारा, दि. 16 - सातारा तालुक्यातील शेंद्रे परिसरातील शिवाजीनगर येथील शिलोबा डोंगरावर असलेल्या शिलनाथ देवाच्या यात्रेस निघालेल्या भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला चढविला. यामध्ये 32 भाविक जखमी झाले असून, जखमींमध्ये सहा बालकांचा समावेश आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. मधमाश्यांनी हल्ला केल्यानंतर बऱ्याच जणांनी कड्यावरून उड्या टाकल्या. त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले.
शेंद्रे परिसरातील शिवाजीनगर येथील शिलोबा डोंगरावरील शिलनाथ देवाच्या यात्रेचा रविवारी मुख्य दिवस होता. या यात्रेला परिसरातील गावातील भाविक दर्शनासाठी येत असतात. रविवारी पहाटे सहा वाजल्यापासून भाविक मंदिरात गोड नैवेद्य घेऊन जात होते. अचानक डोंगराच्या कपारीला असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यावरील माशा उठल्या. त्यामुळे भाविकांची धावधाव सुरू झाली. वाट दिसेल तिकडे भाविक धावू लागले. काहींनी तर कड्यावरून खाली उड्या मारल्या. त्यामध्ये बरेचजण जखमी झाले. मधमाश्यांनी भाविकांवर हल्ला केल्याने सुमारे ३२ जण जखमी झाले. लहान मुलेही यामधून सुटली नाहीत. जखमींना काही नागरिक तसेच भाविकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
हल्ल्यातील जखमी
पूजा धनवडे, सोनाली चव्हाण, नीलेश धनवडे, विजय वाकवले, लहू धनवडे, शिवाजी चव्हाण, सूरज वाकवले, कुणाल पाटील, ओमकार धनवडे, तुषार बाकले, आदेश निपाणे, श्रद्धा धनवडे, रामदास धनवडे, सायली चव्हाण, सुनीता माने, स्वप्नील बाकले, प्रथमेश बाकले, राधिका धनवडे, जया कदम, वनिता बाकले, विशाल कदम, सचिन बाकले (सर्व रा. शिवाजीनगर), सचिन धनवडे, लक्ष्मण लावंगरे, विवेक चव्हाण, विनायक चव्हाण (सर्व रा. मापरवाडी), ईश्वरी धनवडे, सान्वी चव्हाण, सोमेश्वर कदम, सिद्धेश कदम, सोमनाथ गायकवाड, प्रतीक निपाणे या सहा बालकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूवीर्ही अशीच घटना घडली होती.