झहीर-सागरिकाने घेतले कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:59 IST2017-12-01T23:10:59+5:302017-12-01T23:59:02+5:30

कोल्हापूर : माजी क्रिकेटपटू झहीर खान व सुप्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे या नवदाम्पत्याने शुक्रवारी सायंकाळी येथील करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले.

 Zaheer-Sagari took the view of Ambabai in Kolhapur | झहीर-सागरिकाने घेतले कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन

झहीर-सागरिकाने घेतले कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन

ठळक मुद्दे सागरिका घाटगे मूळच्या कोल्हापूरच्या नागरिकांनी गर्दी केली

कोल्हापूर : माजी क्रिकेटपटू झहीर खान व सुप्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे या नवदाम्पत्याने शुक्रवारी सायंकाळी येथील करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतले. या नवदाम्पत्यास पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू झहीर खान व सागरिका घाटगे यांचा विवाह झाला होता. घाटगे या मूळच्या कोल्हापूरच्या असल्याने त्या आपल्या पतींसह अंबाबाई दर्शनाला आल्या. दरम्यान, देवस्थान समितीतर्फे या नवदाम्पत्याला अंबाबाईची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.हे दाम्पत्य मंदिर परिसरात आल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्या संगीता खाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबूराव हजारे, विजय जाधव आदी उपस्थित होते.

 

Web Title:  Zaheer-Sagari took the view of Ambabai in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.