गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 17:15 IST2019-01-18T17:14:31+5:302019-01-18T17:15:15+5:30
गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन गौतम मल्लू कांबळे (वय 22, रा. तामगाव, ता. करवीर) कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी झाला आहे. कसबा वाळवा (ता. राधानगरी) येथे आज सकाळी ही घटना घडली. गौतम ९५ टक्के भाजला आहे.

गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
कोल्हापूर : गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन गौतम मल्लू कांबळे (वय 22, रा. तामगाव, ता. करवीर) कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी झाला आहे. कसबा वाळवा (ता. राधानगरी) येथे आज सकाळी ही घटना घडली. गौतम ९५ टक्के भाजला आहे.
गौतम कांबळे हा ऑक्टोबरपासून कसबा वाळवे येथील सचिन शिवाजी पाटील यांच्या गुऱ्हाळात काम करतो. गुऱ्हाळात चुलीमध्ये चिप्पाडे टाकण्याचे काम तो करत होता. आज सकाळी गौतमने अचानक उकळत्या काहीलीत उडी घेतली.
गुऱ्हाळ घरातील दुसरा कामगार रघुनाथ वाळवेकर यांनी हा प्रकार पाहून आरडा ओरड केली, मात्र उकळत्या काहिलीतुन त्याला बाहेर काढण्यास उशीर झाला. कामगारांनी त्याला तातडीने सीपीआर येथे दाखल केले.