राणेंना भांडवलदारांकडून आश्वासन : सुधीर सावंत
By Admin | Updated: July 23, 2014 21:55 IST2014-07-23T21:44:04+5:302014-07-23T21:55:14+5:30
काँग्रेसमधील दलालांनी किंवा भांडवलदारांनी दिले असेल,

राणेंना भांडवलदारांकडून आश्वासन : सुधीर सावंत
वेंगुर्ले : नारायण राणे २००५ मध्ये काँग्रेसमध्ये जाताना त्यांना मुख्यमंत्री बनविण्याचे आश्वासन काँग्रेसच्या अध्यक्षा किंवा केंद्रातील नेत्यांनी दिले नव्हते. तर त्यांना काँग्रेसमधील दलालांनी किंवा भांडवलदारांनी दिले असेल, असे विधान शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष कर्नल सुधीर सावंत यांनी वेंगुर्ले येथे केले.
सुधीर सावंत यांनी वेंगुर्ले येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवराज्य पक्षाचे जिल्हा संघटक दीनानाथ वेर्णेकर उपस्थित होते. सन २००३ मध्ये मी नारायण राणे हे काँग्रेसमध्ये येणार, असे सांगितले होते. त्यावेळी माझ्यावर हल्लाही झाला होता. काँग्रेसमधील दलालांनी व भांडवलदारांनी मला विरोध करण्यासाठी नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्याशिवाय एकही काँग्रेसचा आमदार निवडणुकीत निवडून आला नाही.
मग राणे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे नाटक करून मुख्यमंत्रीपद कसे काय मागतात हे काँगे्रसलाच ठाऊक , असे सावंत म्हणाले. कोकणातील मतदारांनी काँगे्रसच्या विरोधात मत न टाकता राणे यांच्या विरोधातच टाकले आहे. यापुढच्या निवडणुकीत कोकणातील मतदार राणे व त्यांच्या मुलाच्या विरोधात मतदान करणार आहे.
त्यामुळे शिवराज्य पक्षात येण्याची आॅफर आमदार दीपक केसरकर यांना दिली असल्याचे सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)