कोल्हापूर : महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:04 IST2018-12-10T11:40:15+5:302018-12-10T12:04:06+5:30
महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या ४१ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा पराभव झाला. त्यांना ३३ मते मिळाली. विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवक, समर्थक, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

कोल्हापूर : महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे
कोल्हापूर : महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या ४१ मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा पराभव झाला. त्यांना ३३ मते मिळाली. विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवक, समर्थक, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
महापालिकेतील सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कायद्याचा आधार घेत घरचा मार्ग दाखविण्याचा होत असलेले प्रयत्न, त्यानंतर भाजप-ताराराणी आघाडीकडून झालेले नगरसेवक फोडाफोडीचे प्रयत्न, नगरसेवकांना आपल्याकडेच ठेवण्यात करावी लागत असलेली कसरत, आमदार हसन मुश्रीफ व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेले इशारे-प्रतिइशारे आणि शिवसेनेची तटस्थ राहण्याची भूमिका पाहता महापौर-उपमहापौर निवडणूक उत्कंठावर्धक तसेच तणावपूर्णही ठरली. राष्ट्रवादी कॉँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. त्यामध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांनी ४१ मतांसह बाजी मारली.
शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित
या निवडीवेळी शिवसेनेचे चार नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले. त्यामध्ये नगरसेवक नियाज खान, राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले, अभिजित चव्हाण यांचा समावेश होता.