कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघांची निदर्शने; प्रवेशद्वार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:50 IST2018-05-18T17:50:43+5:302018-05-18T17:50:43+5:30

‘खुल्या प्रवर्गातील पदोन्नती प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो’, ‘ वेतन फरक मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी विद्यापीठात निदर्शने केली.

Kolhapur: exhibition of Shivaji University staffing teams; Entrance gathering |  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघांची निदर्शने; प्रवेशद्वार सभा

 विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात निदर्शने केली. (छाया : नसीर अत्तार)

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघांची निदर्शने; प्रवेशद्वार सभापदोन्नती प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या प्रशासनचा निषेध असो

 कोल्हापूर : ‘खुल्या प्रवर्गातील पदोन्नती प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो’, ‘ वेतन फरक मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी शुक्रवारी विद्यापीठात निदर्शने केली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात दुपारी दोन वाजता शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे (सुटा) पदाधिकारी, सदस्य जमले. याठिकाणी त्यांनी प्रलंबित मागण्या आणि कार्यवाही करण्याबाबत दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

यानंतर संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम यांनी मार्गदर्शन केले. या निदर्शनामध्ये संघाचे अध्यक्ष सुनिल देसाई, संजय पसारे, संतोष वंगार, मनोहर कुलकर्णी, रेहाना मुरसल, बी. एन. बाणदार, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: exhibition of Shivaji University staffing teams; Entrance gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.