तुरुंगात महिला कैद्यांनी केले नग्न आंदोलन, पोलिस अधिकारी दहशतीखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:53 IST2017-10-04T12:27:47+5:302017-10-04T15:53:47+5:30
एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये रवानगी केल्यामुळे संतापलेल्या त्या कैदींनी त्यांचा संताप अश्या भयानकप्रकारे व्यक्त केला.

तुरुंगात महिला कैद्यांनी केले नग्न आंदोलन, पोलिस अधिकारी दहशतीखाली
जेलमधील काही महिला कैद्यांनी नग्न होऊन आंदोलन करत स्वत:ला एका कोठडीत डांबून घेतल्याने तेथील पोलिस अधिकाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं.
वेस्ट यॉर्क येथील न्यु हॉल तुरुंगातील या घटनेत सगळ्याच कर्मचाऱ्यांनी जीव मुठीत घेतला होता. एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये रवानगी केल्यामुळे त्या कैदी संतापल्या होत्या. आणि त्यांनी त्यांचा संताप अश्या भयानकप्रकारे व्यक्त केला. वास्तविकता या घटनेत कुणी कैदी, अधिकारी किंवा कर्मचारी जखमी झालेला नाही.
आंदोलन करणाऱ्या त्या सर्व आरोपी 23 ते 34 वयोगटातील आहेत. त्यांपैकी एकजण खुनाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. तर काही ड्रग्ससबंधित गुन्हा, मनुष्यविक्री आणि हल्ल्याच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत आहेत. या कृत्याबद्दलही त्या सहा जणींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फोटो - www.thesun.co.uk कडून
या प्रसंगात घाबरलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, ’त्या जोर-जोरात किंचाळत होत्या आणि तुरुंगातील अधिकाऱ्यांना धमकावत होत्या. खरं सांगायचं तर त्यांचे नग्न देह आणि भय़ानक धमक्या ऐकून आम्ही खुप घाबरलो होतो.’
तर दुसरा कर्मचाऱ्याने माहिती दिली की,’मोठ्या प्रयत्नानंतर त्या सहा महिलांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांना पुन्हा अटक करुन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली गेली.’