चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 19:05 IST2017-11-15T19:00:03+5:302017-11-15T19:05:16+5:30
चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव रस्त्यालगतच्या शेतात घडली घटना

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव दि.१५ : बिबट्याने शेतात कपाशी वेचणाºया दीपाली नारायण जगताप (वय २५) या महिलेवर हल्ला केला. यात ही महिला जागीच ठार झाली. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता वरखेडे गावापासून एक कि.मी. अंतरावर दरेगाव रस्त्यालगतच्या शेतात घडली.
या महिलेचे घर शेतातच आहे. बुधवारी दुपारी कपाशी वेचणी करीत असतांना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्या मयत झाल्या. गेल्या आठ दिवसापासून सायगाव, उंबरखेडे, वरखेडे, पिलखोड परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. सोमवारी देखील मेंढपाळांना तो याच परिसरात दिसला होता.
यापूर्वी देखील बिबट्याच्या हल्ल्यात उंबरखेडे येथील एक महिला व अकरा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. सायगाव येथील शेतात काम करणा-या दोन महिलाही बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहेत.