दोन चिमुकल्यांना विष पाजून मातेनेही केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:50 IST2018-07-12T12:49:42+5:302018-07-12T12:50:31+5:30

मध्यप्रदेशातील धवनी येथील घटना

Toxic poisoning of two sperms and toxin is done by mother | दोन चिमुकल्यांना विष पाजून मातेनेही केले विष प्राशन

दोन चिमुकल्यांना विष पाजून मातेनेही केले विष प्राशन

ठळक मुद्देमहिलेवर चोपडा येथे उपचारदोन्ही मुलांना धुळे येथे हलविले

जळगाव : एका दीड वर्षे व दुसऱ्या पाच महिन्यांच्या पोटच्या मुलांना विष पाजून स्वत:देखील विष प्राशन केल्याची घटना धवनी (मध्यप्रदेश) येथे घडली. यातील महिलेवर चोपडा येथे उपचार सुरू असून दोन्ही मुलांना बुधवारी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन नंतर धुळे येथे हलविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, धवनी येथे मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास दीपाली सुनील बारेला (वय दीड वर्ष) व तुळशीराम सुनील बारेला (वय पाच महिने) या दोन्ही चिमुकल्यांना त्यांच्याच आईने विष पाजून स्वत:देखील विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुबीयांनी तिघांनाही चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
त्या ठिकाणी उपचार करून दोन्ही बालकांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार या बालकांना बुधवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही धुळे येथे हलविण्यात आले. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: Toxic poisoning of two sperms and toxin is done by mother